पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर येथील अत्याधुनिक आरोग्य सुविधा असलेल्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे सोमवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी, अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचाही शुभारंभ होणार असल्याची माहिती डॉ. विश्वजीत देशमुख यांनी दिली आहे.
या नेत्रसेवा विभागाचा शुभारंभ सकाळी दहा वाजता सौ व श्री रमेश देशमुख यांचे हस्ते होणार आहे. यावेळी माजी आमदार प्रशांतराव परिचारक, आ.समाधान आवताडे, आ. अभिजीत पाटील, माजी आमदार शहाजीबापू पाटील, आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठलची माजी चेअरमन भागीरथ भालके, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, जयसिंग देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख, डॉ ऋतुजा उत्पात, डॉ अमरसिंह जमदाडे, डॉ अमितकुमार आसबे, यांचेसह लाईफ लाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मधील डॉ .कुलदीप कोलपकवार, डॉ .प्रवीण वायकुळे, डॉ. शुभम शिंदे, डॉ. भाग्यश्री वायकुळे, डॉ . वर्षा कोलपकवार, डॉ. पौरवी शिंदे , डॉ.श्रद्धा देशमुख, डॉ. राहुल राठोड, डॉ.सचिन बेलदार, डॉ .संजय देशमुख, डॉ.मंजुषा देशमुख, आदी उपस्थित राहणार आहेत.
या अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचे शुभारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहनही डॉक्टर देशमुख यांनी केली आहे.
إرسال تعليق