Pundalik Samachar

प्रांताधिकारी अधिकारी बी आर माळी यांच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी . कोळी महादेव जमातीला संविधानिक हक्कापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप




मंगळवेढा /

                  मंगळवेढा येथील प्रांताधिकारी बी आर माळी हे कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र मागणीचे प्रस्ताव थातुर मातुर कारणे देऊन व कायद्यात नसलेल्या अटी घालुन फेटाळत असुन कोळी महादेव जमातीला संविधानिक हक्कापासून वंचित ठेवत आहेत असा आरोप करून जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी त्यांच्या कारभाराची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी सकल कोळी जमातीचे अभ्यासक बाळासाहेब बळवंतराव यांनी केली आहे. 
           महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती ,भटक्या जमाती ,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग, जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनिमयन अधिनियम 2000 व नियम 2003 या कायद्यानुसार जात प्रमाणपत्र निर्गमित केले जाते.
        या कायद्यामध्ये अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र निर्गमित करत असताना सक्षम अधिकारी यांनी कोणते कागदपत्रे तपासावीत त्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत .त्या निर्देशानुसार विहित नमुन्यांमध्ये अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मागणी प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे दिले असता अधिनियमामध्ये दिलेल्या तरतुदीचा कोणताही विचार न करता थातूर मातूर बेकायदेशीर कारणे देऊन जात प्रमाणपत्र मागणी प्रस्ताव फेटाळत असून संविधानिक हक्कापासून वंचित ठेऊन हाकनाक कोळी महादेव जमातीच्या लोकांना त्रास देत आहेत.
               वरील कायद्याप्रमाणे एस्सी ,ओबीसी, एनटी व्हीजेएनटी यांना जात प्रमाणपत्र दिली जातात. फक्त कोळी महादेव जमातीचे प्रस्ताव फेटाळले जात आहेत. विनाकारण जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पुणे यांच्याकडे अपील करा म्हणून सांगत आहेत. बी आर माळी सक्षम आधिकारी की असक्षम आधिकारी आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.त्यामुळे कोळी महादेव जमातीचे बांधव संविधानिक हक्कापासून वंचित राहत आहेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 342 नुसार कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचा दर्जा दिला आहे स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतरही कोळी महादेव जमातीवर  प्रांताधिकारी अत्याचार करत आहेत. कोळी महादेव जमातीकडे ते पूर्वग्रह दूषित नजरेने पाहत आहेत जमातीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन निगेटिव आहे. संविधानिक पदावर बसून संविधानाची पायपल्ली करणाऱ्या या अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे. कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यासाठी यांची नेमणूक झाली आहे की मागणी प्रस्ताव फेटाळण्यासाठी ? असा सवाल त्यांनी विचारला आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांनी मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी बी आर माळी यांच्या कारभाराची सखोलचौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सकल कोळी जमातीचे अभ्यासक बाळासाहेब बळवंतराव यांनी सा. पुंडलिक समाचारशी बोलताना केली असून लवकरच त्यांची तक्रार जिल्हाधिकारी सोलापूर विभागीय महसूल आयुक्त पुणे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले
आहे.

आपल्या परिसरातील बातम्या तसेच जाहिरातीसाठी संपर्क

विजयकुमार कांबळे

संपादक

सा. पुंडलिक समाचार,वेब पोर्टल व PS न्युज चॅनेल

मो-; 8888388139/9004537171

Vijaykumarkamble501@gmail. com


Post a Comment

Previous Post Next Post