Pundalik Samachar

रस्त्यावर कचरा टाकल्यास होणार दंडात्मक कारवाई -; मुख्याधिकारी महेश रोकडे


पंढरपूर /प्रतिनिधी

 पंढरपूरात आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक, वारकरी येतात. सोहळ्यानिमित्त भाविकांचे, वारकऱ्यांचे दशमी, एकादशी व व्दादशी असे तीन दिवस वास्तव्य असते. त्यामुळे वारकरी, भाविकांचे आरोग्य चांगले राहणे गरजेचे आहे. याकरीता पंढरपूर नगरपालिका स्वच्छता मोहिम राबवत आहे. मात्र, शहरातील व्यक्ती, दुकानदार, व्यावसायिक, मठधारक, किरकोळ विक्रेते हे रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे, तसेच उघड्यावर लघुशंका करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर मलविष्ठा, मुत्रविष्ठा करणे, उघड्यांवर शौच करणे टाळावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा सुचना मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिल्या आहेत

      पंढरपूर नगरपरिषदेने जाहीर सूचनेद्वारे आवाहन केले आहे की, केंद्र शासनाने अधिसूचना क्रमांक एस.ओ. 1357 (3) दि. 08 एप्रिल 2016 अन्वये घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केले आहेत. या नियमांची अंमलबजावणी शहरांमध्ये प्रभावीपणे चालू आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 च्या तरतुदीचे अनुपालन न करणार्‍या व्यक्ती, सेवा, दुकानदार, व्यावसायिक, मठधारक, किरकोळ विक्रेते यांच्याकडून नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करत दंड वसूल करण्यात येणार आहे.

दंड वसूल करण्यासाठी आरोग्य निरीक्षक, मुकादम, प्राधिकृत केलेले कर्मचारी यांना अधिकार देण्यात येत आहेत. तरी घनकचरा अधिनियम धोरणातील तरतुदींची अंमलबजावणी करून आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक, भाविक, वारकरी, दुकानदार यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

         महास्वच्छता अभियान कार्यक्रमास ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही पंढरपूर शहरातील सर्व नागरिक व्यापारी, व्यावसायिक यांनी आपापल्या दुकानासमोर कचरा टाकण्यासाठी छोट्या छोट्या कचरा पेट्या ठेवाव्यात. त्यामध्येच कचरा टाकून तो नगरपालिकेच्या कचरा संकलन टीम कडे द्यावा. त्याप्रमाणेच विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत येणार्‍या वारकरी, भावी यांनीही कचरा कोठेही रस्त्यावर टाकू नये. नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या जवळपासच्या कचराकुंड्यामध्येच कचरा टाकावा, असे आवाहन केले होते. असेही मुख्याधिकारी श्री रोकडे यांनी सांगितले. 

...अशी असेल दंडात्मक कारवाई-;

 ★ रस्त्यावर कचरा टाकणे-180 रुपये दंड.
★ कचरा जाळण-5000 रुपये दंड
★उघड्यावर लघुशंका करणे, 1000 रुपये दंड
★सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, 150 रुपये दंड
★उघड्यावर मलविष्ठा, मुत्रविष्ठा करणे-200 रुपये दंड
★उघड्यांवर शौच करणे - 500 रुपये दंड

आपल्या परिसरातील बातम्या तसेच जाहिरातीसाठी संपर्क

विजयकुमार कांबळे

मुख्य संपादक

सा. पुंडलिक समाचार,वेब पोर्टल व PS न्युज चॅनेल

मो-; 8888388139/9004537171

Vijaykumarkamble501@gmail. com

                                            

Post a Comment

Previous Post Next Post