Pundalik Samachar

श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक श्री. दुर्गा देवीमाता पोशाख सह अलंकार परिधान,

पंढरपूर /

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने घटस्थापनेपासून सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवानिमित्त नवव्या माळेला श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींना प्रथा-परंपरेनुसार विविध सुवर्णालंकार परिधान करण्यात आले. यावेळी श्री रुक्मिणी मातेस पारंपरिक श्री दुर्गादेवीमातेचा पोशाख परिधान करण्यात आला. देवतांचे मनोहारी व भक्तिमय स्वरूप पाहण्यासाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे याबाबतची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक  प्रविणकुमार घम यांनी दिली.

श्री विठ्ठलास सोन्याचे मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेठया जोड, शिरपंच मोठा, शिरपेत लहान, मोत्याचा तुरा, तुळशीची माळ एक पदरी, लॉकेट पाच पदरी, लहान चंद्रहार, लॉकेट नऊ पदरी, लॉकेट पट्टीचे, अष्टपैलू मण्याची कंठी, मोहनमाळ, अष्टपैलू कंठी पदकासह, लॉकेट बदामासह, तोडे जोड, लॉकेट चार पदरी, मत्स्य जोड, सोने पितांबर इ. अलंकार परिधान करण्यात आलेली आहेत.

तसेच रुक्मिणी मातेस जडावाचा मुकुट, जडावाचा हार, नवरत्नाचा हार, बाजूबंद जोड,खड्यांची वेणी, पाचूची घरचोळी, चिंचपेटी पांढरी, हातसर जोड, पानाड्याचा हार, तन्मणी मोठा, मद्रासी कंठा,मास पट्टा, शिंदेहार, जडावाचे ताणवट जोड, चंद्र,सूर्य, मोत्याचा कंठा, बाजीराव गरसोळी, पेठयांची बिंदी, खड्यांच्या पाटल्या जोड, मोत्याचे मंगळसूत्र, मत्स्य जोड, पैंजणजोड, मोठी नथ, वाक्या जोड, सोन्याचा करंडा, वाक्याजोड, तोडे जोड, छत्रछामर इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

  • राधिका मातेस नक्षी टोप, पुतळ्यांची माळ, लक्ष्मीहार, जवेची माळ, हायकोल, मोहरांची माळ इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

  • सत्यभामादेवीला सिद्धेश्वर मुकुट, पुतळ्यांची माळ, जवेची माळ, जवमणि पदक, चिंचपेटी हिरवी, इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

  • महालक्ष्मी मातेला सोन्याचे गंठण, मोत्याची कंठी एक पदरी, मोत्याची कंठी एक पदरी पाचूचा लोलक असलेली, एकदाणी, चंद्रहार पाच पदरी, चांदी छत्री, साखळ्या जोड, तुळशीची माळ इत्याधी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

  • श्री. व्यंकटेशास नक्षी टोप प्रभावळीसह, पैंजणजोड, तांदळाहार, मोहनमाळ, सूर्यकल्यांचाहार, दंडपेट्या जोड, इमिटेशन नेकलेस, मोत्याची कंठी एक पदरी, हिऱ्याचा कंबरपट्टा इत्यादी अलंकार प्रथा परंपरेप्रमाणे परिधान करण्यात आलेले आहेत.

तसेच मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात आलेले आहेत.

दि. २२ ऑक्टोबर गुरुवार रोजी एकादशी असल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन दर्शनरांगेतील गर्दीचे नियोजन, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, पिण्याच्या पाण्याची व चहावाटपाची व्यवस्था, आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग, विद्युत व्यवस्था आणि इतर अनुषंगिक सोयी-सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

भाविकांना सुरक्षित, सुलभ व सुव्यवस्थित दर्शन घेता यावे, यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, उत्सवकाळात भाविकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.

👉 आपल्या परिसरातील बातम्या तसेच जाहिरातीसाठी संपर्क

विजयकुमार कांबळे

मुख्य-संपादक

सा. पुंडलिक समाचार,वेब पोर्टल व PS न्युज चॅनेल

मो.no-; 8888388139/9004537171

Mail -; vijaykumarkamble501@gmail.com

Post a Comment

Previous Post Next Post