Pundalik Samachar

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावली मनसे, तातडीची रोख दहा हजार रुपयांची देऊ केली मदत

पंढरपूर/प्रतिनिधि

अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना व पुराच्या पाण्यामुळे घरांची पडझड झालेल्या कुटुंबियांना आज मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी शेतकर्यांच्या बांधावर जावून प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली . संकटातील शेतकर्यांना  रोख स्वरुपात आर्थिक मदत करुन त्यांच्या मदतीला धावून जाणारी मनसे ही राज्यातील पहिला ठरली आहे. 

पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. मागील दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील तपकिरी शेटफळ, उंबरगाव, बोहाळी या भागाला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे, येथील शेतकर्यांची मका, बाजारी,तूर,डाळिंब,बोर,द्राक्ष आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  नुकसानीमुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.  अतिवृष्टी आणि पुरामुळे  तपकिरी शेटफळ येथील शेतकरी  सदाशिव चौगुले यांची चार एकर डाळिंबाची बाग पूर्णपणे उध्दवस्त झाली  आहे. त्यांचे सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तर याच गावातील अनेक गोरगरीबांच्या घरात पावसाचे शिरल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. घरातील अन्नधान्य आणि इतर साहित्य वाहून गेल्याने तेही चिंताग्रस्त झाले आहेत. अशा संकटाच्या वेळी मनसेचे नेते दिलीप धोत्रे त्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. 
दिलीप धोत्रे यांनी शुक्रवारी (ता.26) तपकिरी शेटफळ येथे नुकसान झालेल्या शेती पिकांची पहाणी केली. यावेळी सदाशिव चौगुले या नुकसानग्रस्त शेतकर्याला त्यांच्या बांधावर जावून रोख दहा हजार रुपयांची मदत केली तर पावसामुळे घराचे नुकसान झालेल्या  गरीब कुटुंबानाही प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली.  संकटकाळी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी शेतकरी प्रती दाखवलेल्या सहानभुतीची आणि मदतीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.  
यावेळी  मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, पंढरपूर शहराध्यक्ष संतोष कवडे, शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, विभाग अध्यक्ष नागेश इंगोले,उपतालुकाध्यक्ष लखन घाडगे, तपकिरी शेटफळ येथील मनसे शाखाध्यक्ष नवनाथ पळसे,अण्णा कांबळे,आकाश बंदपट्टे आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

चौकट●●●●●

 { कृषी मंत्र्यांनी दिले सरसकट पंचनामे करण्याचे आदेश 
 शुक्रवारी दिलीप धोत्रे यांनी नुकसान झालेल्या पिकांची पहाणी केली. पहाणी दरम्यान  अनेक शेतकर्यांनी नुकसान झालेल्या  पिकांचे  पंचनामे केले नसल्याची तक्रार केली. यावेळी श्री. धोत्रे यांनी मोबाईलवरुन  कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संपर्क साधून त्यांना या भागातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची माहिती दिली. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी  अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे  आदेश दिले. शासनाच्या मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही.  असे आश्वासन  दिले. }

👉 आपल्या परिसरातील बातम्या तसेच जाहिरातीसाठी संपर्क

विजयकुमार कांबळे

मुख्य-संपादक

सा. पुंडलिक समाचार,वेब पोर्टल व PS न्युज चॅनेल

मो-; 8888388139/9004537171

Vijaykumarkamble501@gmail. com

Post a Comment

Previous Post Next Post