पंढरपूर / प्रतिनिधी
यंदाचा महाराष्ट्र उद्योजक गौरव पुरस्कार धोत्रेज ग्रँड उद्योग समूहाचे प्रमुख दिलीप धोत्रे यांना नुकताच जाहीर झाला असून रविवारी पुणे येथे शिवर्पण चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने बिझनेस आयकॉन ऑफ द इयर पुरस्काराने सिने अभिनेत्या वर्षा उसगावकर यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दिलीप धोत्रे यांना गौरवण्यात येणार आहे.
अल्पावधीत धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड व मनसे ॲग्रो इंडस्ट्रीजने घेतलेल्या गरुड भरारीमुळे आणि उद्योग समूहाचे प्रमुख दिलीप धोत्रे यांनी केलेल्या कार्याचे दखल घेऊन त्यांना नुकताच शिवर्पण चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा महाराष्ट्र उद्योजक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
दिलीप धोत्रे यांनी ग्रँड पंचतारांकित हॉटेल, ग्रँड ट्रॅक्टर्स, पेट्रोल पंप, डी डी इन्फ्रा, विठाई अर्बन निधी बँक, मनसे ऍग्रो इंडस्ट्रिज या सह विविध उद्योगाच्या माध्यमातून शेकडो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच महिला सक्षमीकरणासाठी लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यांचे सामाजिक कार्यातही मोठे योगदान दिले आहे. याची दखल घेऊन रविवारी पुणे येथे त्यांचा बिजनेस आयकॉन ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या तसेच जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
संपादक
सा. पुंडलिक समाचार,वेब पोर्टल व PS न्युज चॅनेल
मो-; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail. com
Post a Comment