पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर : पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेत, पंढरपूर येथे प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त २०० कदंब वृक्षांचे रोपण संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज शिवाजी मोरे महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उपक्रमाचा प्रारंभ गौतम विद्यालय परिसरातून झाला.
विशेष म्हणजे, वृक्षांच्या संवर्धनासाठी प्रत्येक रोपावर लोखंडी ट्री गार्ड बसविण्यात आले. त्यामुळे हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न राहता दीर्घकालीन पर्यावरणपूरक बांधिलकी दर्शवितो.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्त्व स्पष्ट करताना वाढते तापमान, हवामानातील अनियमित बदल आणि प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून वृक्षारोपणाची गरज अधोरेखित केली. वृक्ष कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, ऑक्सिजन पुरवतात तसेच पर्जन्यमान वाढविण्यातही मदत करतात, हे यावेळी सांगण्यात आले.
हा उपक्रम रवी सर्वगोड यांच्या माध्यमातून राबविण्यात आला. कार्यक्रमाला गौतम विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकुमार वाघमारे, स्थानिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी व सतिश सर्वगोड, स्वप्नील मोरे,गणपत सर्वगोड, शिद्धनाथ सांवत, राजू सर्वगोड, कृष्णा सर्वगोड, शरद सोनवने, सुरज साखरे, संग्राम माने, स्वप्नील कांबळे, अमोल पाटील, लालमहम्मद शेख, जुबेर बागवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी रोपांच्या जतन व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली.
या उपक्रमामुळे परिसर हिरवागार होण्याबरोबरच पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ, निरोगी व शाश्वत पर्यावरणाचा वारसा मिळण्यास हातभार लागणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या तसेच जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
संपादक
सा. पुंडलिक समाचार,वेब पोर्टल व PS न्युज चॅनेल
मो-; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail.com
Post a Comment