Pundalik Samachar

अबब....तब्बल बारा तोळे सोने आणि तीस भार चांदी जप्त, पंढरपूर शहर पोलीसांना यश

पंढरपूर

 पंढरपुर शहर पोलीस ठाण्याच्या"गुन्हे प्रकटीकरण शाखेने 12.50 तोळे सोन्याचे दागिणे व 30 भार चांदीचे घरफोडीत चोरी झालेले दागिणे  धडाकेबाज कामगीरी करत आरोपीकडुन १७ लाख १,५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल  जप्त केला आहे.

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दि. 25 रोजी घरफोडी झाल्याचा गुन्हा दाखळ झाला होता. त्याअुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखा तपास करत होती. पोलीस अधिक्षक  अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रेरणा कटटे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली "गुन्हे प्रकटीकरण" शाखेने विशेष पथके नेमले. पंढरपुर शहर व आजुबाजूचे सी.सी.टी. व्ही फुटेज चेक करून व मोबाईल टॉवरचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्हयात आरोपी  सुनिलकुमार रामसिंग राजपूत (वय. २६)  रा. मुळग्राम बिकापुरी, पोस्ट हिरापुरा भिंड. मध्यप्रदेश, संध्या रा. आढेगाव टेंभुर्णी ता. माढा, जि. सोलापूर यास ताब्यात घेतले.दि.२७ रोजी अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेले १२.५० तोळे सोन्याचे दागीने व ३० भार चांदीचे दागीने असे व असा एकुण १७,०१,५०० जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी  पोसई सुप्रिया रावण, पोलीस उपनिरीक्षक  नितीन जगताप, सपोफौ सुजित उबाळे, सचिन हेंबाडे, अनिल बनसोडे, अस्लम काझी, गणेश पवार, हर्षद ठाकर, शहाजी मंडले, सांवत, प्रविण मेटकरी यांनी केली आहे.



👉 आपल्या परिसरातील बातम्या तसेच जाहिरातीसाठी संपर्क

विजयकुमार कांबळे

मुख्य-संपादक

सा. पुंडलिक समाचार,वेब पोर्टल व PS न्युज चॅनेल

मो-; 8888388139/9004537171

Vijaykumarkamble501@gmail. com

Post a Comment

Previous Post Next Post